• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी ‘भक्ती संगीत संध्या’चे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 23, 2023
in जळगाव जिल्हा
0
भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी ‘भक्ती संगीत संध्या’चे आयोजन

जळगाव, दि.२३ – औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी २५ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात संध्याकाळी ६ वाजता होईल.

यामध्ये विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले जाईल. कार्यक्रमावेळी अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा अनिल जैन  यांची प्रमुख उपस्थिती असेल. स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांशी भवरलाल जैन सुसंवाद साधायचे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असायचे हाच संस्कार आजही अनुभूती निवासी स्कूलमध्ये तंतोतंत पाळला जातो.

या श्रद्धेपोटी विद्यार्थ्यांनी विशेष भक्ति संगीत संध्या चे आयोजन केले आहे. भक्ती संगीत संध्यामध्ये प्रेम, आपुलकी व सामाजिक बांधिलकीतून संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान अधोरेखित केले जाणार आहे. गीतांच्या शब्दांमधील अर्थासह श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्याचे स्मरण केले जाईल. विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट शैलीमध्ये निवेदनही सादर केले जाईल. या भक्ती संगीत संध्येला उपस्थित राहून नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.


 

Next Post
कोळी महासंघचा पदोन्नतीचा कार्यक्रम संपन्न

कोळी महासंघचा पदोन्नतीचा कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add