जळगाव, दि. २६ – कोळी महासंघाच्या पदोन्नतीचा कार्यक्रम शनिवारी शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्याची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात येऊन सर्वांना पद नुकत्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा भरामधून मोठ्या संख्येने समाजबांधवांसह महिला भगिनी देखील उपस्थित होत्या.
यावेळी आमदार रमेश पाटील राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी नियुक्ती पदोन्नती संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार रमेश दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ,देवानंद दादा भोईर कल्याण महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, चंद्रकांत सोनवणे माजी आमदार चोपडा महाराष्ट्र राज्य सल्लागार, प्रभाकर सोनवणे अश्विन सोनवणे युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, बाळासाहेब सैंदाणे सल्लागार महाराष्ट्र राज्य ,मुकेश सोनवणे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, हरलाल कोळी रावेर लोकसभा अध्यक्ष, अण्णा कोळी जळगाव लोकसभा अध्यक्ष, नितीन कांडेलकर उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र,
प्रभाकर सोनवणे महाराष्ट्र उपाध्यक्ष, आत्माराम कोळी जिल्हा परिषद सदस्य संघटक, देवानंद भोईर उपाध्यक्ष महासंघ महाराष्ट्र, पंडित जोहरे सल्लागार, व्ही. टी. नाना, संदीप कोळी जिल्हा युवा अध्यक्ष, सुभाष सोनवणे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख, संतोष सोनवणे रावेर लोकसभा उपाध्यक्ष, दीपक तायडे जिल्हा युवक उपाध्यक्ष, मोहन शंकरपाळ जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना अध्यक्ष, अरुण इंगळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख, महेंद्र सपकाळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख उपाध्यक्ष, हेमलता सोनवणे रावेर लोकसभा महिला अध्यक्ष, ममता सोनवणे महिला जळगाव महानगर अध्यक्ष, मंगलाबाई सोनवणे जळगाव महानगर महिला उपाध्यक्ष, आदींचा सहभाग होता.