जळगाव, दि.१५ – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १६ रोजी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
गुरुवार, दिनांक १६ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी २.३० ला मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने भोकर, जि. जळगाव हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी २.५५ वाजता भोकर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण होणार आहे.
दुपारी ३.०० वाजता भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन व पुढील प्रमाणे विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण.. १) शिवाजी नगर येथील कि.मी. ४२०/९/११ वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण.. २) मोहाडी (जळगाव) येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे.. ३) म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन.. ४) जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन.. ५) बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम.. ६) धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम.. ७) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे.. ८) जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम.. ९) धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम.
सायंकाळी ५.१५ वाजता भोकर येथून मोटारीने भोकर हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी ५.२० वाजता भोकर हेलिपेंड येथे आगमन व हेलिकॉप्टरने टेहू, ता. पारोळा हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी ५.४० वाजता टेहू, ता. पारोळा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळाकडे प्रयाण. सायंकाळी ५.५५ वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे आगमन. सायंकाळी ६.०० वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन व जाहीर मेळावा. सायंकाळी ७.३० वाजता राखीव, रात्री ८.०० वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री ९.०० वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.