• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 16, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

जळगाव, दि.१६ – मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील वापर जैन हिल्सवरील संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर दिसत आहे. यातून हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शाश्वत शेतीचा विश्वास निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली. जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त अनिल भोकरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

अभ्यास दौरावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे, डी. एम. बऱ्हाटे, श्रीराम पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे सहकारी व शेतकरी उपस्थित होते. गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत. याठिकाणी आधुनिक शेती करीत असतांना मुख्य भेडसावणार प्रश्न म्हणजे मजुरांची टंचाई यासाठी यांत्रिकीकरणाचा सुरेख संगम दिसते. कोरडवाहू फळबाग लागवड, कमी जागेत कमी पाण्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढता येईल याचे प्रात्यक्षिक जैन हिल्सवर बघायला मिळते.

शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर आधुनिक तंत्रज्ञानाची आणि कमी खर्चाची शाश्वत उत्पादन घेण्याची सांगड याठिकाणी दिसून येत असल्याचे अनिल भोकरे म्हणाले. तंत्रज्ञानातून किफायतशीर काटेकोर पद्धतीने शाश्वत शेतीचा मार्ग शेतकऱ्यांना गवसत आहे. माझ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत यातून शेतीवरचा वाढता खर्च कमी करून योग्य तो सकारात्मक बदलांसह कांद्याची किफायतशीर शेती कशी करावी असा संदेश या अभ्यास दौरातून मिळत आहे. या अभ्यास दौऱ्यात कृषिविभागातील अधिकारी, अभ्यासक यासह शेतकऱ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

 


Next Post
हळद पिकातून मिळेल आर्थिक समृद्धीचा मार्ग – डॉ.निर्मल बाबू

हळद पिकातून मिळेल आर्थिक समृद्धीचा मार्ग - डॉ.निर्मल बाबू

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group