जळगाव, दि.१५ – संत सेवालाल महाराज जयंती निमित्त जळगाव महानगरपालिकेत संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते बुधवारी माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सुनील खडके, नगरसेविका सीमा भोळे, लता भोईटे, रेखा पाटील, अंजना सोनवणे, सरिता नेरकर, सुचित्रा हाडा, आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे आदींसह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.