जळगाव, दि.०७ – जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित मुस्लीम समुदायाच्या क्रिकेट स्पर्धेचा रिफॉर्मेशन कप जिंकण्याचा मान मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघाने पटकावला. युथ ऑफ जळगावतर्फे जी.एस. ग्राउंडवर या क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या.
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच मुस्लीम समुदायाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युथ ऑफ जळगावतर्फे करण्यात आले. रिफॉर्मेशन कपच्या स्पर्धा दि.४ आणि ५ फेब्रुवारी रोजी जी.एस. ग्राउंड मैदानावर पार पडल्या. तरुणांना एकमेकांशी जोडणे, फिटनेस, खेळांचे महत्व पटवून देणे, संयम आणि उत्साह जागरूक करणे, संघ भावना वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेत जळगावातील ८ संघ सहभागी झाले होते. संघाचे प्रायोजकत्व वसीम बापू , नदीम मलिक, यासीन मुल्तानी, लालू पटेल, मिर्झा हारिस व शोएब सत्तार, नेहाल शकील रंगरेज, शाहबोद्दीन भाई यांनी स्वीकारले होते.
दोन दिवसीय स्पर्धेत अंतिम सामना रंगरेज शॉपी विरुद्ध मिर्झा ब्रदर्स यादगार संघात रंगला असता ७८ धावांचे लक्ष गाठताना रंगरेज शॉपी संघाचा १० धावांनी पराभव झाला. अखेरच्या तीन षटकात कोण विजयी ठरणार याची मोठी उत्सुकता लागून होती. शेवटच्या षटकापर्यंत चुरस कायम होती. मॅन ऑफ द सीरिजचा बहुमान रफिक शेख, मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ, बेस्ट बॅट्समॅन किताब एयू सिकलगर संघाचा खेळाडू मुजाहिद जहागीरदार याने तर बेस्ट बॉलरचा बहुमान मिर्झा ब्रदर्सच्या शाहरुख लाली या गोलंदाजाने पटकावला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीतील ऑर्गनाइजर रेहान खाटिक, शारीक शेख, आमिर शेख, आसिफ मिर्झा, सद्दाम पटेल, जकी अहमद, आसिफ पटेल, अज़हर खान, शोएब बागवान, अलफैज़ पटेल, आमिर पटेल, नदीम खान, शोएब खान, शाहरुख लाली, अतीक शेख, साद शेख, तौकीर खान, नेहाल शेख, तनवीर खान, आकीब खान यांनी परिश्रम घेतले.
समालोचक म्हणून असिफ मिर्झा, अलफैज पटेल, रेहान करिमी, रौशन भाई यांनी आपले कर्तव्य पार पाडले व सूत्र संचालन आसिफ मिर्झा यांनी केले तर आभार रेहान खाटीक यांनी मानले.