• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लता मंगेशकर यांना बहारदार गीतांनी आदरांजली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 6, 2023
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
लता मंगेशकर यांना बहारदार गीतांनी आदरांजली

जळगाव, दि.०६ – भारतरत्न लता मंगेशकर त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा “वो जब याद आये”.. या कार्यक्रमाचे आयोजन भाऊंच्या उद्यानात रविवारी करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मिनिट स्तब्ध उभे राहून लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीप प्रज्वलन शहराच्या महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अदनान देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.

वो जब याद आये.. या कार्यक्रमात सहभागी झालेले कलावंत हे सर्व जळगावचेच असून गेली अनेक वर्षे ते जळगावच्या सांस्कृतिक विकासात आपले योगदान देत आहेत. यामध्ये जी गाणी सादर केली गेलीत ती सादर करणारे कलाकार म्हणजे ऐश्वर्या परदेशी, मयूर पाटील, मानसी आळवणी, प्राजक्ता केदार, किरण कासार हे होते. मयूर चौधरी व किरण चौधरी यांनी गिटारची उत्तम साथ या कार्यक्रमाला केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश देवळे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने केले.

वो जब याद आये.. या कार्यक्रमात खालील गाणी सादर करण्यात आली. ओम नमोजी आध्या, लग जा गले, तुझसे नाराज नाही जिंदगी हैराण हूं मै, नाम गुम जायेगा, कुहू कुहू बोले कोयलिया, रैना बित जाये, ओ सजना बरखा बहार आयी, रहे ना रहे हम, वो जब याद आये बहुत याद आये, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी राहू दे, प्यार हुवा एकरार हुवा है, कजरा मोहबत वाला, गम है किसिके प्यार में, मेरे जीवन साथी इ. एकापेक्षा एक गाणी अप्रतिम रित्या सादर झालीत.

या गाण्यासोबत दोन अप्रतिम नृत्य सादर झाली या तिन्ही कलावंत डॉ. अपर्णा भट यांच्या शिष्या व प्रभाकर कला संगीत च्या कलाकार होत्या. चलते चलते या पाकिझा चित्रपटातील अजरामर गीतावर व उई मा उई मा ये क्या हो गया या गीतावर कोमल चव्हाण, हिमानी पिले, व रिद्धी सोनवणे यांनी नृत्य सादर केले. रसिक या कार्यक्रमात मंत्रमुग्ध झाले. रविवारची संध्याकाळ रसिकांची या आदारांजलीच्या माध्यमातून सुरेल झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
विवेकी विचारांच्या बळकटीसाठी क्रियाशीलता महत्त्वाची; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक संपन्न

विवेकी विचारांच्या बळकटीसाठी क्रियाशीलता महत्त्वाची; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम
क्रिडा

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम

September 24, 2023
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर
जळगाव जिल्हा

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

September 23, 2023
शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू

September 19, 2023
जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न
क्रिडा

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

September 19, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

September 19, 2023
शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव जिल्हा

शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 17, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.