भडगाव, दि.०३ – येथील कजगाव ग्रामपंचायती कडून दिव्यांगाना मोफत सायकल वाटप करण्यात आली. दरम्यान सायकल वाटप कार्यक्रम हा ग्रामविकास निधीतून करण्यात आला असून भाग्यश्री साहेबराव महाजन व पूर्वी नरेश पवार यांना सायकल भेट देण्यात आली.
दिव्यांग भगिनींना मोफत सायकल मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक सोनवणे, मांगीलाल मोरे, माजी ग्रा.प.सदस्य अनिल महाजन, अनिल टेलर, दिनेश धाडीवाल, दिनेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.