जळगाव, दि.०४- मेहरूण येथे समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान येथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी शनिवारी भेट देऊन प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतली. संबंधित तक्रारदार यांच्याशी चर्चा करून प्रकरणे समजून घेतली. त्यामुळे लाडवंजारी समाजबांधवांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सुरुवातीला समितीचे सदस्य राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गजानन खराटे, लिपिक नरेश जोशी यांचा लाडवंजारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर सन २०१२ पासून वंजारी युवा संघटना, वंजारी सेवा संघ आणि समाजसेवक देविदास साबळे यांच्या पाठपुरावा करीत असलेल्या विविध प्रकरणांची सदस्यांनी माहिती घेतली. त्याबाबत संवाद साधून सत्यस्थिती समजून घेतली. यावर लवकरच योग्य तो निर्णय होईल, अशी माहिती सदस्यांनी दिली.
यावेळी लाडवंजारी समाज अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष व वंजारी सेवा संघाच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवक प्रशांत नाईक, देविदास साबळे, संजय खडसे, नामदेव वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, संतोष चाटे, रमेश चाटे, सुदाम वाघ, भागवत पाटील, रवींद्र घुगे पाटील चिचोली, महारु नाईक तळेगांवकर, प्रमोद चाटे, निलेश लाड, गणेश चाटे, वासुदेव लाडवंजारी, मयूर वंजारी आदी उपस्थित होते.