• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

काला घोडा या आंतरराष्ट्रीय महोत्सवात परिवर्तनच्या ‘अमृता साहिर इमरोज’ नाटकाची निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 31, 2023
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
काला घोडा या आंतरराष्ट्रीय महोत्सवात परिवर्तनच्या ‘अमृता साहिर इमरोज’ नाटकाची निवड

जळगाव, दि.३१- मुंबई येथील काला घोडा महोत्सव हा जगभरात प्रसिद्ध असून साहित्य, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य , इंस्टॉलेशन अशा विविध कलांनी समृद्ध असलेला हा महोत्सव आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. मुंबई येथे होणाऱ्या या महोत्सवात फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळत असतो. या महोत्सवात परिवर्तन निर्मित ‘अमृता साहिर इमरोज’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे.

हे नाटक सध्या महाराष्ट्रभर गाजत असून राज्यातील अनेक प्रमुख शहरात नाटकाचे प्रयोग झाले आहेत. शंभू पाटील लिखीत या नाटकाचे दिग्दर्शन मंजुषा भिडे यांनी केले असून, निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर व हर्षल पाटील आहेत. तांत्रिक बाजू राहुल निंबाळकर व मंगेश कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. यात जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर व शंभु पाटील यांच्या भुमिका आहेत.

भारतातील श्रेष्ठ पंजाबी लेखिका अमृता प्रितम यांच्या जिवनावर आधारित हे नाटक अनेक पातळीवर समकालीन अनेक गोष्टींचा शोध घेत. यामुळेच अनेकस्तरीय हे नाटक मराठी रंगभूमीवरचा हा आगळा वेगळा प्रयोग म्हणून नाट्यकर्मी या नाटकाकडे पहात आहेत.

आता हे नाटक हिंदुस्थानी भाषेत येत असून त्याचे भाषांतर रवी मिश्रा यांनी केले आहे. मुंबईत होणा-या काला घोडा महोत्सवात ६ फेब्रुवारी सोमवारी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे होणार आहे. परिवर्तन निर्मित नाटकाच्या निमित्ताने जळगावच्या हौशी रंगभूमीवरील नाटकाची प्रथमच काला घोडा महोत्सवात निवड झाली असल्याने खान्देशच्या रंगभूमीचा हा सन्मान आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

Next Post
मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

ताज्या बातम्या

‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची
खान्देश

‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची

November 26, 2025
आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता
खान्देश

आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

November 26, 2025
‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा
खान्देश

‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा

November 26, 2025
मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक न घेण्याची ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाची मागणी
खान्देश

मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक न घेण्याची ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाची मागणी

November 26, 2025
अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा
खान्देश

अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा

November 26, 2025
१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!
खान्देश

१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!

November 25, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group