जळगाव, दि.३१ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी मंगळवारी मुंबई येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.
या प्रसंगी भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील मनसेचे लोकनियुक्त सरपंच दिलीप सुरवाडे, ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, राजेंद्र ढाके, यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, महानगर अध्यक्ष किरण तळले, विभाग अध्यक्ष संदीप मांडोळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.