जळगाव, दि.१६ – शहरातील आदर्श नगर येथे अखिल भारतीय जिवा सेना व समाज बांधवांच्या वतीने शिवरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य संपर्कप्रमुख किशोर सूर्यवंशी, ऑल इंडिया सेन समाज प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. मनोहर खोंडे, अखिल भारतीय जिवा सेना युवक प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, अखिल भारतीय सेन समाज राष्ट्रीय सचिव राजकुमार गवळी, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, बापूसाहेब महाले, राजेंद्र सूर्यवंशी, नाभिक संघाचे उपाध्यक्ष महारु ईसे, शहर सचिव अनिल निकम, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, जिल्हा सहसचिव संजय सोनवणे, जिवा सेना शहर उपाध्यक्ष राहुल निरपगारे, भरत निकम, पंकज सोनगीरे, रामा सोनवणे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान मान्यवरांनी शूरवीर जिवाजी महाले यांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याला उजाळादेत भावना व्यक्त केल्या. व भविष्यात सामाजिक संघटन कसे करायचे याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज सोनवणे यांची नात कुमारी कार्तिकी या एक वर्षिय चिमुरडीच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सूत्र संचलन देविदास फुलपगारे यांनी तर आभार प्रदर्शन संजय सोनवणे यांनी मानले.