• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 17, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

जळगाव, दि.१५ – अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर १२ वर्षे खालील मुलांच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि.१२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी ठरला आहे. या स्पर्धेत शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूर, नाशिक क्रिकेट ॲकॅडमी नाशिक, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा ऑरेंज जळगाव, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा ब्ल्यू जळगाव या चार संघांनी सहभाग घेतला होता.

सर्व सामने लीग पद्धतीने खेळविण्यात आले. त्यात नाशिक क्रिकेट ॲकॅडमी सर्व सामने जिंकून आणि जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी ब्ल्यू दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी ब्ल्यू संघ विरुद्ध नाशिक क्रिकेट ॲकॅडमी नाशिक यांच्या दरम्यान झाला. जैन स्पोर्ट्स ब्ल्यू संघाने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करत ३० षटकात ८ गडी बाद १०८ धावा केल्या. त्यात मानस पाटील ४२, दक्ष आठवले १९ व अहमद खान नाबाद १० धावा यांचे योगदान होते.

गोलंदाजीत नाशिक क्रिकेट ॲकॅडमीतर्फे राजवीर बोथरा व मंथन पिंगळे प्रत्येकी ३ गडी बाद केले. १०९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या नाशिक क्रिकेट ॲकॅडमी संघ २१.४ षटकात सर्व गडी बाद ९५ धावा करू शकला. त्यात रियांश मुंदडा १९ आर्यन गवळी नाबाद १४ व आर्य पारख १२ धावा करू शकले. गोलंदाजीत जैन स्पोर्ट्स संघातर्फे रोनक मिश्रा व अमेय चौधरी प्रत्येकी २ गडी बाद केले तर चार फलंदाज धावबाद झाले आणि हा सामना जैन स्पोर्ट्स ब्लू संघाने १३ धावांनी जिंकला.

या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मानस पाटील व अमय चौधरी या दोघांना देण्यात आला. मालिकावीर म्हणून नाशिक क्रिकेट ॲकॅडमी आर्यन घोळके, उत्कृष्ट फलंदाज म्हणून जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा मानस पाटील, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा अमेय चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

बक्षीस समारंभ अंतिम सामन्यानंतर लगेच घेण्यात आला. याला जैन इरिगशनच्या कृषितिर्थ मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांच्या मुख्य उपस्थितीती होती. या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, नाशिक संघाचे प्रशिक्षक श्रीरंग कापसे, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे प्रशिक्षक मुस्ताक अली व तन्वीर अहमद, फजल मोहंमद व पालकवर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी केले.


Next Post
श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त मेहरूण मध्ये ‘दरबार मेरे साई का’ साईकथेचे आयोजन

श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त मेहरूण मध्ये 'दरबार मेरे साई का' साईकथेचे आयोजन

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group