जळगाव, दि. १७ – मेहरूण येथील श्री साईबाबा मंदिराच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने “दरबार मेरे साई का” या चारदिवसीय साईकथेचे दि.२२ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.
बीड येथील कथाकार साईगोपालजी देशमुख महाराज हे सुश्राव्य कथा सांगणार आहेत. कार्यक्रम संध्याकाळी ७. ३० वाजेपासून तीन दिवस साईबाबा मंदिर, मेहरूण येथे होणार आहे. बुधवारी महाप्रसाद होईल. श्री साई मंदिरात शिर्डी येथील हुबेहूब मूर्ती बसविण्यात आली आहे. मंदिरात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी येऊन दर्शन घेतले आहे. मंदिराची जागा एक एकरच्या जवळपास आहे.
मंदिर परिसरात माजी नगरसेविका श्रीमती सुभद्रा सुरेश नाईक सामाजिक सभागृहदेखील उभारण्यात आला आहे. हे सभागृह सामाजिक, धार्मिक कामासाठी विनामूल्य दिले जाते. यामुळे श्री साईबाबा यांचे नाव देशभर पोहोचत आहे. साईबाबा मंदिराला दिवसागणिक वैभव प्राप्त होत आहे. या मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आता दि.२२ ते २५ जानेवारी दरम्यान साईकथेचे आयोजन झाले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.