जळगाव, दि. १२ – लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना कोणताही राजकिय वारसा मिळालेला नव्हता. मुंडे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिले. राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले होते. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. मुंडे साहेबांच्या सोबत महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांसाठी काम करता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. राजकीय पक्षांना त्यांची आजही उणीव भासते असे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मेहरूण येथील गोपीनाथराव मुंडे चौकामध्ये त्यांच्या प्रतिमेला समाज बांधवांनी माल्यार्पण केले. त्यानंतर शिवतीर्थ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
यानंतर राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे हस्ते गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य प्रतिमेला पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार राजूमामा भोळे, समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, रॅली समिती प्रमुख तथा नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक शुचिता हाडा, दीपमाला काळे, राजेंद्र घुगे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर ढोल ताशांच्या गजरात तसेच गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याविषयी वंदन करणाऱ्या गीतांवर समाज बांधवांनी ठेका धरला. रॅली शिवतीर्थ चौक, नवीन बस स्थानक, नवीन बस स्थानक, स्वातंत्र्यवीर चौक, आकाशवाणी चौक या मार्गी जाऊन लाडवंजारी मंगल कार्यालय या ठिकाणी विसर्जित झाली.
रॅलीमध्ये मेहरुण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एका सजवलेल्या रथावर गोपीनाथराव मुंडे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. तसेच त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारा रथ देखील रॅलीमध्ये होता. रॅलीमध्ये हजारो समाज बांधवांनी सहभाग घेतला.
रॅलीसाठी किरण वाघ, विनोद ढाकणे, उमेश वाघ, प्रवीण सानप, समाधान चाटे, कैलास सांगळे, कृष्णा पाटील, विजय पाटील, सुनील घुगे महादू सोनवणे राहुल लष्करे अशोक निंबोले तुकाराम वाघ देविदास इखे आदींनी परिश्रम घेतले. जिल्हा पोलीस दलाने रॅलीसाठी सहकार्य केले.
प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन..
रॅली संपल्यानंतर लाडवंजारी मंगल कार्यालय या ठिकाणी मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी , समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थांनचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, महपौर जयश्री महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, जामनेर येथील नगरसेविका किरणताई पोळ, नगरसेवक प्रशांत नाईक, वा.ना.आंधळे, चिंचोलीचे सरपंच शरद घुगे, बोदवड येथील वराडे, मुक्ताईनगर येथील कैलास वंजारी, अंतुर्ली येथील वैभव वंजारी, वरडसिंग येथील देविदास नाईक, एरंडोल येथील शरद आंधळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महारक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिर प्रमुख किशोर ढाकणे, सचिन लाडवजारी, सागर घुगे, गजानन वंजारी, वैभव सानप, हेमंत लाडवंजारी, सागर सानप, राजेंद्र नाईक आदींनी परिश्रम घेतले.