जळगाव, दि.१२- ‘सामान्य घटकातील विद्यार्थ्यांना परिस्थितीचे भान निर्माण करून देणारे शिक्षण अनुभुती मधून दिले जाते, भवरलालजी जैन यांची हीच इच्छा होती. विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हायला हवा, याच विचारांनी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची निर्मिती करण्यात आली आहे. असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. ते अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘फाउंडर्स डे २२-२३’ उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शहरातील छत्रपती संभाजी नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलूभाऊ जैन, कविवर्य ना.धो. महानोर, डॉ. सुभाष चौधरी, अशोक जैन, अतुल जैन, निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम..
विद्यार्थ्यांनी सुमारे तीन तास विविध सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. यामध्ये सरस्वती वंदना, स्वागत गीत, गणेश वंदना (नृत्यसह), पसायदान, कृष्णलीला (नाट्य), वासुदेव, मोगली (नाट्य), विक्रम वेताळ नाट्य, फुलराणी, राज्याभिषेक सोहळा (नाट्य आणि नृत्य याचा सुरेख संगम करण्यात आलेला होता.) टॉम सॉयर, यानंतर हिंदी कवी संमेलन सादर झाले. नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर यांचे स्वागत ‘टू बी ऑर नॉट टू बी’ नाट्य सादर केले. चार्ली चापलीन, जुलिय सिजर नाट्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता.
गुणवंतांचा सन्मान..
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये २०१९ -२० आणि २०२०- २१ या शैक्षणिक वर्षांमध्ये पहिल्या तीन क्रमांकाचे, त्याच प्रमाणे विविध विषयात पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रणव राऊत, चंचल पवार, रोशन पवार, ओजस्वी बोरसे, श्रुती खैरनार, शर्वरी वाडकर, कल्पना जोशी, पूर्वा राजपूत, वैष्णवी पवार, निकिता सोनवणे, विजया बारी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्यावतीने कु. चंचल पवारने मनोगत व्यक्त केले.
वंदे भारतच्या विद्यार्थ्यांचा सन्मान…
भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे झाले. त्या निमित्ताने अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यासमोर ‘वंदे भारत’ अंतर्गत कार्यक्रमाचे संचालन केले. ही स्कूल साठी मोठी गौरवाची बाब म्हटली पाहिजे. त्यात सहभागी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र सन्मान कार्यक्रमातील करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. कार्यक्रमास नितीन लढ्ढा, अनिश शहा फरहाद गिमी, सौ. ज्योती जैन, डॉ. भावना जैन पालक मोठया संख्येने उपस्थित होते. तीन तासाच्या या कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नृत्य, नाट्य आणि गायन अश्या विविध गुण वैशिष्ट्ये असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने श्रोते भारावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना मारकड यांनी तर आभार प्रदर्शन राणी चौबे यांनी केले.