जळगाव, दि.०८- येथील समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान, मेहरूण यांच्यातर्फे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन १२ डिसेंबर रोजी शहरात करण्यात आले आहे. रॅली नंतर महारक्तदान शिबिर होणार आहे. तसेच जानेवारी महिन्यात वंजारी समाज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
दरवर्षी माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात येत असते. यंदा देखील सोमवारी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोर्ट चौक येथून रॅली काढण्यात येणार आहे. रॅली नवीन बस स्थानक, स्वातंत्र्यवीर चौक, आकाशवाणी चौक मार्गे लाडवंजारी मंगल कार्यालयात विसर्जित होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रावेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास नागरे उपस्थित राहतील. यासह ज्येष्ठ साहित्यिक वा.ना. आंधळे, श्रीराम विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल लाड, बोदवड येथील प्राचार्य सुरेश वराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर नाईक, महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, जामनेरचे नगरसेवक किरण पोळ, जिल्हा परिषदेतील अधिकारी सचिन वंजारी, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले आहे.
वंजारी समाज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा..
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वंजारी समाज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन दि. ६ ते ८ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. ही स्पर्धा शिरसोली रस्त्यावरील रायसोनी महाविद्यालयाच्या शेजारील मैदानावर होणार आहे.