जळगाव, दी.०९ – महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा गुरूवारी युवासेना जळगाव महानगर तर्फे त्यांच्या प्रतिमेला काळं फासून निषेध करण्यात आला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांचा मेंदू ठिकाणावर आहे का असा सवाल युवासेने च्या वतीने करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कडून वारंवार महापुरुषांचा अवमान करण्यात येतो त्याचा निषेध म्हणून आज महानगरपालिका इमारती समोर युवासेना महानगर च्या वतीने भगतसिंग कोश्यारी व प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध करण्यात आला. महानगर समन्वयक महेश ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, उपजिल्हा प्रमुख विशाल वाणी, शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, जिल्हा चिटणीस अंकित कासार, महानगर अधिकारी अमोल मोरे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, कॉलेज कक्ष प्रमुख प्रीतम शिंदे, गजेंद्र कोळी, मयूर गवळी, अजिंक्य कोळी, ऋषिकेश शर्मा, नीरज चौधरी, जयेश नेवे, यश राठोड, प्रवीण भगत, तुषार न्हाळदे, हिमांशू सिसोदिया, गौरव जैन, जय कपूर, परेश चोपडा, यश बारी, सुशील पाटील आदी युवासैनिक उपस्थित होते.