• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत.. – ज्ञानेश्वर महाराज

मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा समारोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 22, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत.. – ज्ञानेश्वर महाराज

जळगाव, दि. २२ –  संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मार्गदर्शन हभप ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथा समारोप प्रसंगी केले. प्रसंगी श्रीमद् भागवत ग्रंथाची दिंडी भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली. तसेच काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाचा समारोप झाला.

मेहरुण येथील संत ज्ञानेश्वर चौकांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह कथा संगीतमय भागवत कथेचे १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे बावीसवे हे वर्ष होते.

मंगळवारी सप्ताहाचा समारोप झाला. सकाळी संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा समारोप प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी भाविकांना प्रबोधित करीत भागवत कथेचा अखेरचा अध्याय समजावून सांगितला. भागवत कथेतून जीवनाचे सार कसे मिळतात ते स्पष्ट करून दिले. यावेळी भाविकांच्या उत्साहामध्ये अखेरच्या दिवशी देखील खंड पडला नाही.

भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज यांनी केले.

याप्रसंगी उपआयुक्त प्रशांत पाटील, नागपूर येथील वित्त व लेखा अधिकारी कपिल पवार, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, आशुतोष पाटील, उमेश सोनवणे, लेखाधिकारी अभिजित बाविस्कर, मनपा अधिकारी वानखेडे, नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.

दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर चार वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी भाविकांच्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. महिला भाविकांनी मंगलकलश घेऊन लक्ष वेधून घेतले होते, तर लहान मुलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. दिंडी मेहरुण परिसरामध्ये काढण्यात आली. ठिकठिकाणी दिंडीचे फुलांच्या वर्षावामध्ये स्वागत करण्यात आले.

सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, श्री स्वामी विवेकानंद मंडळ, साईदत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना तसेच श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी आणि मेहरुण ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 


 

Next Post
छात्र सैनिक महाराष्ट्रभर चालवणार सायकल

छात्र सैनिक महाराष्ट्रभर चालवणार सायकल

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add