जळगाव, दि.२४ – राष्ट्रीय छात्र सेनेचे स्थापना आणि आझादी का अमृत महोत्सवाच्या ७५ गौरवशाली वर्षांच्या निमीत्ताने जळगावात १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन महापरिक्रमा मेगा सायकलिंग मोहीम राबविण्यात येत आहे. छात्र सैनिकांची २२०० कि.मी. सायकल मोहीम चा महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
राष्ट्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणीत तरुणांनाचे योगदान सर्वोत्तम आहे. या तारुण्यात चारित्र्य, साहस, नेतृवास आकार देण्यासाठी आणि शारीरिक सहनशक्ती विकसित करण्यासाठी महाराष्ट्र एन.सी.सी डायरेक्टरेट च्या विशेष प्रोत्साहनाने ही सायकल मोहीम देशातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सायकलिंग मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
यात छात्र सैनिक सुमारे २२०० किलोमीटरचे अंतर पार करतील. विशेष म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असलेली बाब म्हणजे चुकीची माहिती समाजात पसरवण्यापासून रोकण्यासाठी (Against Disinformation) छात्रसैनिक या मोहिमेत प्रत्येक शहरात, महाविद्यालयात, शाळांमध्ये या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती देखील करणार आहेत.
अमरावती ग्रुपचे प्रमुख ब्रि. शंतनू मयंकर या मोहिमेचे संपूर्ण नियंत्रक म्हणून असतील. ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल सी पी भाडोला या मोहिमेचे अधिकृत नेतृत्व करतील तर १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, जळगाव चे लेफ्ट. कर्नल पवन कुमार, प्रशाकीय अधिकारी हे देखील मोहिमेत विशेष आयोजक म्हणून योगदान देत आहेत.
मोहिमे सविस्तर माहिती..
राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक (सिनिअर डिव्हीजन) दि. २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान जळगाव येथून सुरुवात करतील. यात अमरावती, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि शेवटी पुणे असा हा प्रवास असणार असून महाराष्ट्रातील एन.सी.सी च्या सर्व विभागीय कार्यालयांना भेट देऊन महाराष्ट्रभर सायाकालीद्वारे परिक्रमा करणार आहेत.
या मोहिमेत मूळजी जेठा महाविद्यालयाचे ४, एन.एम. कॉलेज चे ३, बाहेती कॉलेजे चे २ तर अकोला येथील १ छात्र सैनिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. तर या मोहिमेत एन.सी.सी अधिकारी कॅप्टन (डॉ.) योगेश बोरसे, लेफ्ट. गौतम भालेराव, लेफ्ट. शिवराज पाटील यात मोहिमेत योगदान देणार आहेत. तसेच बटालिअन चे बी.एच.एम. तात्या काकलीज हे सोबत असणार आहेत. मोहिमेसाठी १८ महाराष्ट्र बटालिअनचे बॅक अप वाहन कॅंटर असणार आहे.