• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला प्रयोग

कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन घडविणारे अभिनव नाटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 25, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला प्रयोग

जळगाव, दि.२५ – ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सहकार्याने जळगावात बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी कांताई सभागृह येथे सादरीकरण होणार आहे.

स्थानिक कलाप्रेमींच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास वीस प्रयोग होत आहेत. त्यात पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर, अंबाजोगाई, सेलू, परभणी, हैदराबाद, वरोरा, नागपूर, वर्धा येथील प्रयोगानंतर जळगाव येथे पहिला प्रयोग होत आहे. दोन अंक आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी आहे.

या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे. अनेक मान्यवरांनी कौतुक केलेल्या, सकस आणि रंजक विचार-यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्याी या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

अनोखे रंगमंचीय सादरीकरण..
सुप्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे ‘नरहर कुरुंदकर–एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग आहे. मुंबई आणि नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.

नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात.

 


Next Post
सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल.. – अनिल जैन

सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल.. - अनिल जैन

ताज्या बातम्या

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा
जळगाव जिल्हा

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

June 17, 2025
एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
खान्देश

एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

June 17, 2025
शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना
कृषी

शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

June 17, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

June 16, 2025
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
जळगाव जिल्हा

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

June 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group