• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल.. – अनिल जैन

१५ वा राष्ट्रीय संवादाची सुरूवात; गांधी तीर्थला १६ राज्यातून १०० च्यावर अभ्यासकांचा सहभाग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 25, 2022
in जळगाव जिल्हा
0
सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल.. – अनिल जैन

जळगाव, दि.२५ – शेतीच्या सातबारा पुरूषांच्या नावे असतो; मात्र शेतात सर्वाधिक काम महिला करत असतात. जेव्हा पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांचे नाव सातबारामध्ये लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरूष समानता प्रस्तापित होईल असे महत्त्वपूर्ण विचार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विकास संवाद या संस्थेचे ‘लैंगिक पहचान की चुनौती समानता के सवाल’ हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे विकास संसद आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक पहचान की चुनौती और समानता के सवाल’ या तीन दिवसीय १५ वा राष्ट्रीय संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटक म्हणून अनिल जैन बोलत होते. ही परिषद २७ नोव्हेंबर पर्यंत आहे. पुढे बोलताना अनिल जैन म्हणाले की, आज आपण ज्या जैन हिल्स, गांधीतीर्थ येथे आहोत ते निर्माण करण्यासाठी माझ्या वडिलांना श्रद्धेय भवरलालजी जैन यांना माझी आज्जी गौराई यांनी सात हजार रूपये जी संपूर्ण कुटुंबाची जमापूंजी होती ती दिली. यातून आठ हजार करोड व्यवसायाचा टप्पा गाठणारी कंपनी उभी राहिली. व्यवसायातील पहिली भागीदार आई असे भवरलालजी जैन मानायचे. त्यामुळे स्त्री-पुरूष समानतेचे बाळकडू आम्हाला आपसूक मिळाले.

या राष्ट्रीय संवादात देशभरातील १६ राज्यातून शंभराहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विकास संवादचे समन्वयक सचिनकुमार जैन यांनी प्रास्ताविकात विकास संवाद आणि त्यांचे कार्य याबाबत उपस्थितांना परिचय करून दिला. तर डॉ.अश्विन झाला यांनी गांधी तीर्थ व जैन हिल्स बाबतची माहिती दिली. पहिल्या सत्रात रिता भाटिया यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी गांधी विचारांच्या दृष्टीने स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या समजावून सांगितली.

सुप्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांनी शब्दांच्या माध्यमातून खान्देश व जळगावची सैर घडवून दिली. पुणे येथील विचारवंत आनंद पवार यांनी ‘लैंगिक पहचान की चुनोती और समानता के सवाल’ अशा दोन भागांमध्ये आपले विचार मांडले. या तीन दिवसीय १५ व्या राष्ट्रीय मिडीया संवाद कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा समारोप गांधी तीर्थ येथील ‘खोज गांधीजी की’ ऑडिओ व्हिडीओ गाईडेड संग्राहलयाच्या अनुभूतीने झाला.

स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमतावर आज मार्गदर्शन..
उद्या दि.२६ नोव्हेंबर ला प्रार्थनेने सकाळचे सत्र सुरू होईल. त्यात डॉ. विश्वास पाटील ‘जगदम्बा कस्तूरबा’ यावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात दीपा सिन्हा यांचे स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमता यावर महत्त्वपूर्ण संवाद होणार आहे. अरविंद मोहन याचे ‘हजार बेटियों वाले बापू’ यावर विशेष चर्चा होईल. तर चिन्मय मिश्र हे ‘बच्चों में लैंगिक पहचान की चुनौतियां’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या संवाद कार्यक्रमाचा समारोप रविवारी, २७ नोव्हेंबर ला होईल.

Next Post
संविधानामुळे सशक्त लोकशाही प्राचार्य डॉ. किशोर पाटील यांचे प्रतिपादन

संविधानामुळे सशक्त लोकशाही प्राचार्य डॉ. किशोर पाटील यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम
क्रिडा

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम

September 24, 2023
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर
जळगाव जिल्हा

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

September 23, 2023
शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू

September 19, 2023
जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न
क्रिडा

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

September 19, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

September 19, 2023
शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव जिल्हा

शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 17, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.