जळगाव, दि. २२ – युवासेनेतर्फे शहरातील महाविद्यालयात दि.२१ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०२२ नवीन मतदार नावनोंदणी शिबीर राबविण्यात येत आहे. १८ वर्ष पूर्ण केलेले युवक, युवती ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी आपले नाव या शिबिरात नोंदणी केले.
महापौर सेवा कक्ष यांच्या संकल्पनेतुन प्रत्येक युवक व युवती यांना आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, कॉलेज कक्षप्रमुख प्रितम शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी अमोल मोरे, यश सपकाळे, महेश ठाकूर, अमित जगताप, गिरीश कोल्हे, गजू कोळी, जय मेहता, अजिंक्य कोळी, ऋषिकेश शर्मा, रवींद्र गवळी, नीरज चौधरी, यश लोढा, गायत्री भोईटे, ऋतुजा चौधरी आदींसह युवासैनिक उपस्थित होते.