जळगाव, दि.१५ – शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त जळगाव महानगर तर्फे शिवसेना (ठाकरे गट) सदस्य नोंदणी अभियाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. खा. राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबावून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जळगाव लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, समन्वयक अंकुश कोळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, पियूष गांधी, उप जिल्हाप्रमुख विशाल वाणी, महीला आघाडीच्या मंगला बारी, अल्पंसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, फरीद खान, डॉ.जुबेर खान, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, मतीन सय्यद उपस्थित होते.