• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जे मिळेल त्यातच समाधानी राहतात तेच खरे सुखी.. – एकनाथ महाराज

मेहरुणमध्ये हरी कीर्तनाला प्रारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 17, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
जे मिळेल त्यातच समाधानी राहतात तेच खरे सुखी.. – एकनाथ महाराज

जळगाव, दि. १७ – आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला सुखी व्हायचे आहे. पण सुखी होण्याची व्याख्या नेमकी काय आहे? याच्या शोधात प्रत्येक जण दिसतो. या जगात सुखी तेच आहेत, जे भगवंताचे नामस्मरण करतात व आयुष्यात मिळालेल्या गोष्टींमध्ये समाधानी आहेत, असे मार्गदर्शन कीर्तनकार हभप एकनाथ महाराज यांनी भाविकांना केले.

येथील मेहरूण प्रभागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे २२ वे वर्ष आहे. पहिल्याच दिवशी गुरुवारी रात्री आपल्या ओघवत्या शैलीत कीर्तनकार एकनाथ महाराज यांनी भाविकांचे प्रबोधन केले.

हभप एकनाथ महाराज म्हणाले की, सर्व धावपळ सुखासाठी सुरू आहे. मनुष्यप्राणी सुखी होण्यासाठी धडपडत आहे. मात्र सुख मिळविण्यासाठी कष्ट घेणे कोणालाही चुकले नाही, असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विविध अभंगांचे दाखले दिले. सरतेशेवटी भगवंतच अंतिम हे आपल्याला विसरता कामा नये असे सांगत त्यांनी विविध अभंग आणि भक्तीगीते सादर करीत भाविकांना मार्गदर्शन केले.

यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी रात्री दि.१७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता चिखली येथील हभप दिनेश महाराज किर्तन करणार आहेत.


 

Next Post
सासर आणि माहेरची बाजू जर समजून घेतली तर दोघीकडे स्वर्ग निर्माण होऊ शकतो.. – प्रल्हाद महाराज

सासर आणि माहेरची बाजू जर समजून घेतली तर दोघीकडे स्वर्ग निर्माण होऊ शकतो.. - प्रल्हाद महाराज

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add