जळगाव दि. ०९ – नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (१७ वर्षाआतील) आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा-२०२२ दि.१२ ते १७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला.
यामध्ये तेजम केशव, करण पाटील, उजेर देशपांडे, अर्श शेख, शुभम चांदसरकर, सौम्या लोखंडे, इशिका शर्मा, गार्गी पाटील, सताक्षी वाणी, स्वरा पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे संघटक व प्रशिक्षक म्हणून अतुल देशपांडे व प्रणव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
संघाच्या प्रत्येक सदस्याला जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या. असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, खजिनदार अरविंद देशपांडे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, प्रशिक्षक किशोर सिंह यांनी पुढील वाटचालीसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.