जळगाव, दि. १० – ‘आरोग्यसुरक्षा सेवासकल्पाचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन जळगावकर व परिसरातील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन गुरुवार आज रोजी संपन्न होत आहे. वर्धापनदिनाच्यानिमित्ताने दि. १०, १२, १४, १६ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नाक-कान घसा, दंतरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल तपासणी, नेत्ररोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी इत्यादी संदर्भात तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या शिबीरात तपासणी झालेल्या रुग्णांवर महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ०२५७-२२२३३०१ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. हॉस्पिटलमध्ये उच्चशिक्षित तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स व संबंधित स्टाफसह सुसज्ज नाक कान घसा विभाग, नेत्ररोग विभाग, जनरल मेडिसिन अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधांनी असा किडनी रुग्णांसाठीचा डायलिसिस विभाग, नवजात शिशु विभाग, हृदयरुणांसाठी स्वतंत्र कैथलॅब विभाग व अतिदक्षता विभाग आदीसर्व विभाग प्रभावीपणे कार्यान्वित आहेत.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना तसेच इतर इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधादेखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वास्थ्य सुरक्षेचा संकल्प घेऊन हॉस्पिटल १० नोव्हेंबर २०२२ रोजी समर्पित यशस्वीतेने ५ वर्षे पूर्ण करून सेवा अविरत सुरू आहे.
लोकसभाग व सहकार्याने तसेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलची वाटचाल गतिमान आहे. येणार्या काळात हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा मानस असून पंचमदिनाच्या निमीत्ताने रुग्णालयाचा मानसप्रवासही यशस्वी होऊन उत्तरोत्तर असंख्य गोरगरीब सर्वसामान्य रूग्णांना उत्तम दर्जाच्या सर्व आरोग्य सेवांचा लाभ होईल असे सांगून हॉस्पिटलमधील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्रकाश चौबे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी चंदन अत्तरदे, महाव्यवस्थापक संतोष नवगळे, उपस्थित होते.