जामनेर, दि. ०७ – महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्यावतीने जामनेर येथील पत्रकार संरक्षण समिती पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान जामनेर शहरात रविवारी बीओटी कॉम्प्लेक्स येथे बैठक घेण्यात आली. यात महाराष्ट्र शासन मान्यता पत्रकार संरक्षण समिती पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिततांसमोर आपले विचार मांडले. तसेच सर्वानुमते पत्रकार संरक्षण समिती जामनेर तालुक्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
नुतन कार्यकारिणी खालील प्रमाणे..
तालुकाध्यक्ष बाळु वाघ, उपाध्यक्ष, किरण चौधरी, सह सल्लागार फराज अहमद मो. फारूक, सदस्य शांताराम झाल्टे, नितीन इंगळे, करण साळुंके, अलीयार खान, इमरान खान यांची निवड करण्यात आली.
दरम्यान सर्व समिती सदस्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जामनेर तालुकाध्यक्ष बाळु बाघ, उपाध्यक्ष किरण चौधरी, सह सल्लागार फराज अहमद यांनी केले होते. यावेळी सर्व पत्रकारांना ओळखपत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
समितीचे तालुकाध्यक्ष बाळु वाघ यांनी समितीचे ध्येय व धोरणे सांगितले व पत्रकारांच्या भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील या बाबतीत माहीती दिली. यावेळी कार्यक्रमाला समितीतीचे सर्व जामनेर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.