• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय – चंद्रहास हलाई

गांधी रिसर्च फाऊंडेशनची कार्यशाळा उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 17, 2022
in जळगाव जिल्हा
0
गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय – चंद्रहास हलाई

जळगाव दि.१७ – गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय आहे. गणित आपल्याला समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. गणितातही सराव, साधना व सातत्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील चंद्रहास हलाई यांनी केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित “हाऊ गांधी कम्स अलाईव्ह” अंतर्गत ‘भारतीय गणिताची अद्भुत दुनिया’ विषयावरील कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे संचालक राकेश रामगुंदम, प्रा. गीता धर्मपाल व डॉ अश्विन झाला, सौ. अंबिका जैन आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हलाई म्हणाले कि, आधुनिक गणितातील संकल्पना भारतीय ऋषी मुनींनी आपल्या ग्रंथातून हजारो वर्षांपूर्वी मांडलेल्या आहेत. पिंगलाचार्य, आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, लीलावती आदींच्या ग्रंथांमधील छंद काव्याचा अभ्यास केल्यास त्याची प्रचिती येते. महावीराचार्य यांचा गणितसारसंग्रह ,भास्करांचे सिद्धांत शिरोमणी, कात्यायना सुलभासूत्र, याज्ञवल्क्य यांचा शतपथब्राह्मणम् हि भारतीय गणिताची समृद्धी असल्याचे ते म्हणाले. गणितातील अनेक गमतीजमती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविकात प्रा. गीता धर्मपाल यांनी महात्मा गांधी , गणित व शिक्षण पद्धती यातील संबंध मांडला. कार्यशाळेतील दोन्ही सत्रात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व गणिताच्या सोप्या युक्ती हलाई यांनी विद्याथ्यांना समजावून सांगितल्या. मैथिली थत्ते, भाविक कपूर, सुकीर्ती मणियार, नेहा दसोरे व ऐश्वर्य चोपडा यांनी मनोगत व्यक्त केले. गणित विषयाची भीती गेली, गणिताबद्दल गोडी निर्माण झाली, गणित व इतिहास विषयाचा संबंध कळाला, दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी देखील गणिताचा वापर कसा करता येईल याचे शिक्षण आजच्या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे मिळाले असे त्यांनी म्हटले.

कार्यशाळेस रुस्तमजी इंटरनॅशनल, विवेकानंद प्रतिष्ठान, एल. एच. पाटील विद्यालय, लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क व कॉलेज ऑफ फार्मसी, मु. जे. महाविद्यालय आदींचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कस्तुरबा सभागृह गच्च भरले होते. सूत्र संचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार दीपक मिश्रा, रमीज यांनी केले. यशस्वीतेसाठी उदय महाजन यांच्यासह नितीन चोपडा, डॉ. निर्मला झाला, निलेश पाटील, अदिती त्रिवेदी, रीती साहा, निवृत्ती वाघ, राजू माळी, सुनील तायडे व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.


 

Next Post
केसीई बीपीएड कॉलेजमध्ये खोखो स्पर्धेचे यशस्वी आयोजन

केसीई बीपीएड कॉलेजमध्ये खोखो स्पर्धेचे यशस्वी आयोजन

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add