जळगाव दि.१७ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांना नुकतीच सुरुवात झाली. दि.१६ ऑक्टोबर रोजी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जळगाव क्रीडा विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. साहेबराव भुकन, प्राचार्य डॉ. संजय ना. भारंबे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सहसचिव डॉ. पी. आर. चौधरी व सहभागी महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.
पुरुषांमध्ये नूतन मराठा कॉलेज, जळगाव यांनी विजेतेपद प्राप्त केले तर महिलांमध्ये डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाने विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत पुरुषांच्या सात आणि महिलांच्या एकूण पाच संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत पुरुषांमध्ये समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांनी द्वितीय क्रमांक तर मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिलांमध्ये समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांनी द्वितीय क्रमांक तर शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. अमर हटकर,विनोद वंडोळे, गणेश वंडोळे, निलेश हिवराळे व भावेश आहेरराव यांनी जबाबदारी सांभाळली. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. निलेश जोशी, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, प्रा. अतुल गोरडे, विजय चव्हाण, रोहित पाटील, तेजस महाजन आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.