• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे मंगळवारी गांधी उद्यानात उद्घाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 10, 2022
in जळगाव जिल्हा
0
‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे मंगळवारी गांधी उद्यानात उद्घाटन

जळगाव, दि.१० – येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवारी जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या साजरे होत आहे. या काळातच जागतिक टपाल दिनानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ‘डाक टिकटों में महात्मा’ हे माहितीपूर्ण, रंजक प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या कार्यक्रमास बी.व्ही.चव्हाण (अधीक्षक, टपाल विभाग, जळगाव), जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

‘डाक टिकटों में महात्मा’… 
महात्मा गांधी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी आणि व्यक्तीमत्वांपैकी एक गणले गेलेले आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे. बहुतेक देशांनी महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे जारी केली आहेत. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायला मिळते. टपाल तिकिटांच्या जगात गांधीजी हे सर्वात जास्त दिसणारे भारतीय आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील सर्वाधिक टपाल तिकिटांवर गांधीजींची छबीच बघायला मिळते. टपाल तिकिटांच्या माध्यमातून गांधीजींचे जीवन दर्शन रसिकांना बघायला मिळणार आहे.

जगातील जितक्या देशांनी टपाल तिकिटे काढली आहेत त्या १२० हून अधिक देशांची तिकिटे गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अभिलेखागारात उपलब्ध आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनचा सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्म जयंती पंधरवडा सुरू आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत. टपालाच्या तिकिट संग्रह करणाऱ्यांसाठी, टपाल तिकीट गोळा करणाऱ्या छंद असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

 


 

Next Post
युवा अधिकारी म्हणून अमित जगताप तर कॉलेज कक्ष अधिकारी पदी प्रितम शिंदे

युवा अधिकारी म्हणून अमित जगताप तर कॉलेज कक्ष अधिकारी पदी प्रितम शिंदे

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add