जळगाव, दि.१३ – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया व विस्तारक चैतन्य बनसोडे यांनी जळगाव जिल्ह्याच्या युवासेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर केली आहे.
यामध्ये जळगाव शहर विधानसभेवर विधानसभा युवा अधिकारी म्हणून अमित संजय जगताप यांची तर जळगाव लोकसभेच्या कॉलेज कक्ष अधिकारी पदी प्रितम रविंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीचे माजीमंत्री सुरेशदादा जैन, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, हर्षल माने, जिल्हा संघटक गजानन मालपूरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विस्तारक किशोर भोसले, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अभिनंदन केले. अमित जगताप यांचे आजोबा प्रकाश जगताप हे सुद्धा शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख होते.