जामनेर, दि.१३ – शहापूर जामनेर रस्त्यावर श्रीकृष्ण मंदिरासमोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या अपघात दोन एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
तळेगाव येथील गजानन बाबुराव गोरे व गोपाल जाधव हे दोघे जमनेरहून किराणा सामना घेऊन जात असताना, तर खडकी येथील शाम नाईक हा फत्तेपुर कडून येत होता. दरम्यान बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या दोघं मोटरसायकल स्वारांचा एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. अपघातात तळेगाव येथील ३१ वर्षिय गजानन बाबुराव गोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून गोपाल जाधव आणि शाम नाईक जखमी झाले आहेत.
मयत गजानन गोरे यांच्या पश्चात पत्नी, मुली, आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गोरे कुटुंबावर शोक केकळा पसरली असून या अपघाताचे वृत्त कळताच गावातील अनेक युवकांनी जामनेर कडे धाव घेतली.