• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आयएस ८००८ पहिले परवानाधारक म्हणून जैन इरिगेशनचा गौरव

विश्व मानक दिनाच्या औचित्याने भारतीय मानक ब्युरोने केला सन्मान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 14, 2022
in जळगाव जिल्हा
0
आयएस ८००८ पहिले परवानाधारक म्हणून जैन इरिगेशनचा गौरव

मुंबई, दि.१४ – जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाने भारतात पहिले आयएस ८००८ चे परवानाधारक म्हणून मानांकन घेतले होते. या कार्याला अधोरेखित करत विश्व मानक दिनाच्या औचित्याने भारतीय मानक ब्युरोने गौरव केला. मुंबई येथील हॉटेल मेलुदा द फर्न येथे जैन इरिगेशनचा सन्मान कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ.जनमेजय नेमाडे आणि श्री. सुकुमार यांनी कंपनीच्या वतीने स्वीकारला. तारापूर अणूऊर्जा केंद्राचे केंद्र संचालक डॉ. संजय मुलकलवार यांच्या हस्ते हा गौरव प्रदान केला गेला.

जागतिक मानक दिन दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. भारतीय मानक ब्युरो पश्चित क्षेत्रीय कार्यालय मुंबईतर्फे बीआयएस मानक चर्चासत्र व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ‘Standards for sustainable Development Goals – A Shared Vision for a Better World’ अर्थात ‘सतत विकार लक्ष्यों के लिए मानक बेहतर विश्व हेतु साझा दृष्टिकोण’ असा विषय होता. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश ग्राहक, नियामक आणि उद्योगांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या मानकीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे.

जागतिक मानक दिन पहिल्यांदा १९७० मध्ये साजरा करण्यात आला. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही राष्ट्रीय मानके ठरवणारी भारतातील पहिली भारतीय मानक संस्था आहे, ज्याची स्थापना १९४७ मध्ये झाली. बीआयएस तर्फे रसायन, चिकित्सा उपकरण आणि हॉस्पीटल्स, सिव्हील इंजिनयरिंग, धातूकाम, इंजीनियरिंग, विद्युत तंत्रज्ञान, पेट्रोलियम, कोळसा आणि संबंधित उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्रौद्योगिकी, उत्पादन व सामान्य इंजीनियरिंग (Production and General Engineering), खाद्य व कृषि, कपड़ा (Textile), जल संसाधन इत्यादि क्षेत्रांसाठी मानक देण्यात येतात.

जैन इरिगेशनने भारतात आयएस ८००८ मानकाचा पहिला परवाना घेतला याबाबत कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणात विशेष उल्लेख करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून हे कार्य उभारलेले आहे त्यांच्या विचार व वारश्याची पुढेही वाटचाल सुरू आहे हे विशेष.

 


Next Post
शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल व्हावा याच भावनेतून जैन इरिगेशनचे कार्य – अशोक जैन

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल व्हावा याच भावनेतून जैन इरिगेशनचे कार्य - अशोक जैन

ताज्या बातम्या

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना
जळगाव जिल्हा

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना

July 14, 2025
जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी
जळगाव जिल्हा

जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी

July 14, 2025
टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते
जळगाव जिल्हा

टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते

July 14, 2025
मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

July 14, 2025
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद
गुन्हे

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद

July 14, 2025
ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल
जळगाव जिल्हा

ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

July 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group