गजानन पाटील | अमळनेर, दि. ०२ – येथील छायाचित्रकार महेंद्र पाटील यांनी आपल्या फोटो स्टुडिओमध्ये श्री गणेशाची स्थापना केली आहे. त्यांनी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ यावर आधारित आरासकेली आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेचे प्रदर्शन करीत देखाव्यातून मतदानाचे महत्व पटवून दिले.
महेंद्र पाटील यांनी आपल्या स्टुडिओत एका बाजूस मध्यभागी गणपती बाप्पा विराजमान करून चोहोबाजूंनी लहान-लहान बॅनर वर माझा गणेशोत्सव माझा मताधिकार, तुमचे एक मत ठरवेल देशाचे बहुमत, मतदान कार्ड आधार कार्ड शी जोडा असे अनेक जनजागृती पर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
फोटोग्राफर पाटील यांच्या कल्पकतेतून साकारण्यात आलेल्या देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक भेट देत आहेत. दरम्यान त्यांनी साकारलेल्या आगळ्या वेगळ्या आरासचे सर्वत्र कौतुक होत आहे.