जळगाव, दि. ०२ – मेहरूण तलाव येथील ट्रॅकवर कार ने दिलेल्या धडकेत एका लहानग्या मुलाचा जीव गेल्याची घटना नुकतीच जळगावात घडली होती. दरम्यान संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शहरातील डायमंड व्हाट्स ॲप गृपतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगाव येथे मेहरूण तलाव भागातील पायी फिरण्याच्या ट्रॅकवर अकरा वर्षीय विक्रांत संतोष मिश्रा याचा कारची धडक मारून जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा पालक तथा कारमालक मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा याला अटक करण्याच्या मागणीसाठी डायमंड व्हाट्स ॲप गृपच्या सदस्यांनी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनातील मागण्या..
▪️ संशयित आरोपी कार मालकास अटक होऊन पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
▪️ पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींवर कारवाई करून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी.
तसेच पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींवर कारवाई करून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी आंदोलनात स्व.विक्रांत चे वडील संतोष मिश्रा, महापौर जयश्री महाजन, सरीता माळी-कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक ललित कोल्हे, डाॅ.अनिल पाटील, निलेश पाटील आदींसह डायमंड व्हाट्स ॲप गृपचे सदस्य तसेच शहरातील इतर संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.