जळगाव, दि. ०९ – देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव तसेच क्रांतीदिन व आदिवासी दिना निमित्त शहरात ७५ फूट भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. सुरुवातीला टॉवर चौक येथे आदिवासी दिना निमित्त थोर स्वातंत्र्य सैनानी विरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपन करून तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे (राजु मामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांची प्रमुख उपस्तीती होती.
टॉवर चौक येथून रॅली चित्रा चौक, नवीपेठ, महापालिका, नेहरु चौक पुढे शिवतीर्थ मैदान येथे राष्ट्र गिताने रॅलीचा समारोप झाला. रॅली मध्ये भारत माता की जय, वंदे मातरम्, क्रांती दिनाच्या व विरसा मूंडा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी माजी प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, माजी महापौर भारती सोनवणे, प्रभाकर सोनवणे, कैलास सोनवणे, विधान क्षेत्र प्रमुख दीपक साखरे
दीप्ती चिरमाडे, भा.ज.युमो सरचिटणीस अक्षय जेजुरकर, महेश पाटील, जितेंद्र चौथे, नगरसेवक विरेन खडके, रियाझ शेख, महेश चौधरी, रंजना वानखेडे, मयूर कापसे, राजू मराठे, भरत सपकाळे, गायत्री राणे, दीपमाला काळे, सुचिता हाडा, चंद्रशेकर पाटील, विजय पाटील, अतुल बारी, सुरेखा तायडे, योगेश बागडे, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित आदींसह भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .