भडगाव, दि.०८ – तालुक्यातील कजगाव येथे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे यासाठी भाजप कार्यकर्त्ये व समर्थकांच्या वतीने महादेव मंदिरात दुग्धअभिषेक करून साकडे घालण्यात आले. तसेच आमदार चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्यास तब्बल एक क्विंटल पेढे वाटप करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात केला.
आमदार मंगेश चव्हाण यांची जमेची बाजू म्हणजे ते जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीष महाजन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेली देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांना मंत्री पद द्यावे, अशी मागणी समर्थकांनी लावून धरली आहे.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, धैर्यशील पाटील, किरण जगताप, निवृत्ती महाजन, तुकाराम सोनार, सागर महाजन, पप्पू सोनार व कार्यकर्ते उपस्थित होते.