भुसावळ, दि.२३ – वनसंवर्धन दिना निमित्ताने येथील निसर्ग कॉलनी मित्र परिवार, पर्यावरण जागर प्रतिष्ठान व शैक्षिक आगाजच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गोविंद फालक नगरात खुल्या भूखंडावर शनिवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची विशेष उपस्थिती होती.
जर सर्व एकत्र आले तर काय बदल होऊ शकतो याचा परिणाम आजच्या या कार्यक्रमाचे फलित असल्याचे वक्तव्य मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले. तसेच कॉलनीतील नागरिक बंधू-भगिनींच्या सहभागातून हा नगरपालिकेचा खुला भूखंड विकसित होत असून भूखंड अधिकाधिक आकर्षित कसा होईल ..? या ठिकाणी मुलांसाठी खेळणी व मोठ्यांसाठी ओपन जिम ची निर्मिती करण्याबाबत आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
वृक्षारोपण मोहिमेसाठी संतोष मराठे यांनी राजू महाजन, निलेश पाटील यांच्या मदतीने ७५ खड्डे खोदून संपूर्ण तयारी केली. वृक्ष पूजनानंतर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात सर्व उपस्थित नागरिकांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
दरम्यान व्यासपीठावर नाना पाटील, नगरसेवक निर्मल कोठारी, अॅड. बोधराज चौधरी, शैलजा नारखेडे, पुरुषोत्तम नारखेडे, प्रकाश फालक, महेश फालक, भानुदास पाटील, कालिदास महाजन, राधेश्याम लाहोटी, तसेच सुरेंद्रसिंग पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख, प्रास्ताविक संतोष मराठे तर आभार सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला छगनलाल कोठारी, विनायक मेहता, संतोष मराठे, श्री. मंडलेचा, तेजस चौधरी, अजय गादिया, प्रवीणचंद्र राणे, ईश्वरदास चौधरी, रामचंद्र सुरवाडे, संजय चोरडिया, महेंद्र कोठारी, ताराचंद टेकवाणी, शुभम विसपुते, विलास पाटील, यश कोठारी, अनिल जोशी, वसंत पाटील, निखिल धनगर, येवले बाबा, संतशरण गुप्ता, रविंद्र मस्के, ज्योती मराठे, सृष्टी विसपुते, सुनीता दरगड, सोनाली राठोड, अनिता जोशी, गायत्री मस्के, आदींनी कार्यक्रम यशस्वी साठी सहकार्य केले.