जळगाव, दि.१४ – श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे फुटबॉल असो च्या माध्यमातून सुरू असलेल्या महानगरपालिका क्षेत्रारिय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेला गुरुवारी १७ वर्षा आतील मुलांच्या स्पर्धेला सुरूवात झाली. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते नाणेफेक व फुटबॉलला कीक मारून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन व शाळांचे क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती. पहिला सामना ए. टी. झाबरे विरुद्ध सेंट लॉरेन्स यांच्यात खेळवला गेला या स्पर्धेचे नाणेफेक तसेच फुटबॉल ला किक मारून नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उद्घाटन केले व नंतर प्रत्यक्ष सर्व खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत १३ संघांचा आहे समावेश..
ओरियन सीबीएससी, एटी झांबरे, सेंट लॉरेन्स, सेंट जोसेफ, ओरियन स्टेट, रायसोनी इंग्लिश, इकरा सालार नगर, पोद्दार, एल एस पाटील, विद्या इंग्लिश, रायसोनी मराठी, रोज लँड, गोदावरी स्कूल यांचा समावेश आहे.