• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरूण तलाव परिसरात दोन हजार वृक्षांचा मियावाकी प्रकल्प

एसबीआय व मराठी प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 13, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मेहरूण तलाव परिसरात दोन हजार वृक्षांचा मियावाकी प्रकल्प

जळगाव, दि.१३ – स्टेट बँक ऑफ इंडिया व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून मेहरूण तलावाच्या पूर्वेला विविध प्रकारच्या दोन हजार पाचशे वृक्षांची लागवड मियावाकी पद्धतीने करण्यात येत असून याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासकीय कार्यालय, नाशिक येथील उपमहाप्रबंधक राजीव सौरव, क्षेत्रीय व्यवस्थापक अमित कुमार, मुख्य व्यवस्थापक शिरीष कोल्हे अरुण अटकालिकर यांच्या उपस्थितीत आज सकाळी करण्यात आला.

मियावकी म्हणजे काय ?
जपानी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या पध्दतीला मियावकी असे म्हटले जाते. मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड करतांना २ बाय २ फूट अंतरावर वृक्षलागवड केली जाते. त्यात झाडांची वाढ दहा पट जलद होते. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या स्थानिक प्रजाती लावता येतात. नेहमीपेक्षा तीस पट घनदाट जंगल तयार होते. या झाडांमुळे ३० टक्क्यांपर्यंत कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेण्यास मदत होते. दोन वर्षांनंतर झाडांची निगा घ्यावी लागत नाही. हे जंगल आवाज व धुलीकणास रोध निर्माण करते. या जंगलातून विविध पक्षी व फुलपाखरांना आश्रयस्थान निर्माण होते.

मराठी प्रतिष्ठान प्रथमच अशा प्रकारे वृक्षारोपण करीत असून प्रतिष्ठान ला स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय,जळगांव यांचे सहकार्य मिळत आहे. मियावाकी वृक्ष लागवड शुभारंभ प्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त संध्या वाणी, अनुराधा रावेरकर, निलोफर देशपांडे, दीपक धांडे उपस्थित होते.

Next Post
गिरणा नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

गिरणा नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add