• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाग्यश्री पाटीलने रचला इतिहास ; चौथ्यांदा राष्ट्रीय बुद्धिबळात विजेती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 11, 2022
in क्रिडा
0
भाग्यश्री पाटीलने रचला इतिहास ; चौथ्यांदा राष्ट्रीय बुद्धिबळात विजेती

जळगाव, दि.११ – भुवनेशवर येथे ३२ वी १७ वर्ष वयोगटाच्या राष्ट्रीय अजिंक्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची पाचोरा एम.एम.कॉलेजची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील हिने भारतात इतिहास घडवत चौथ्यांदा राष्ट्रीय विजेती होण्याचा मान पटकाविला. या स्पर्धेत देशभरातील ५६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. हि स्पर्धा स्विस-लीग पद्धतीने ११ फेऱ्यात घेण्यात आली. यात भाग्यश्रीने ७ विजय तर ४ बरोबरी असे अपराजित रहात ९ गुण मिळवत, विजेते पद आपल्या नावे केले. तर दुसरा क्रमांक स्नेहा हलदर (पश्चिम बंगाल), तिसरा क्रमांक तेजस्विनी जी (तमिळनाडू) यांनी पटकाविला.

या आधी भाग्यश्री तीन वेळा राष्ट्रे विजेती ठरली आहे. तसेच नॅशनल स्कुल ला गोल्ड मेडल, कॉमनवेल्थ स्पर्धेत तीन वेळा सिल्वर मेडल, वेस्टर्न आशियाई स्पर्धेत रॅपिड व ब्लिट्झ मध्ये गोल्ड, आशियाई स्कूल स्पर्धेत क्लासिकला सिल्वर, रॅपिड ला ब्रॉंझ तर ब्लिट्झ गोल्ड, आशियाई युथ स्पर्धेत रॅपिड ला सिल्वर, ब्लिट्झ ला गोल्ड, जागतिक ८ वयोगटाच्या क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत ज्यात ७७ देशांचा सहभाग होता. त्यात ब्रॉंझ मेडल असे राष्ट्रीय १६ व आंतरराष्ट्रीय १३ असे एकूण २९ मेडल्स मिळवत भाग्यश्रीने भारताची मान उंचावली आहे. या स्पर्धेत ९०,०००/- रु. रोक रक्कम सोबत आशियाई व जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.

भाग्यश्रीच्या यशा बद्दल तिचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, नाशिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेले, सचिव सुनील शर्मा, अहमदनगर बुद्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सचिव यशवंत बापट, पाचोरा एम. एम. कॉलेजचे चेयरमन संजय वाघ, परिवर्तन जळगावचे नारायण बाविस्कर, पुरुषोत्तम चौधरी, मंजुषा भिडे यांनी अभिनंदन केले.

Next Post
‘बोलवा विठ्ठल’ कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

'बोलवा विठ्ठल' कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी
गुन्हे

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी

May 9, 2026
कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित
गुन्हे

कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

May 9, 2026
नशिराबाद महामार्गावर महावितरणचा अडथळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे सत्र, प्रशासनाचे दुर्लक्ष
जळगाव जिल्हा

नशिराबाद महामार्गावर महावितरणचा अडथळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे सत्र, प्रशासनाचे दुर्लक्ष

May 9, 2026
जळगाव जिल्ह्यात पोलिसांची ‘विशेष नाकाबंदी’! ५ तासात ३१९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
गुन्हे

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची ‘विशेष नाकाबंदी’! ५ तासात ३१९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

May 9, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
जळगाव जिल्हा

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

May 9, 2026
व्यसनाच्या गर्तेतून नवजीवनाकडे: डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणावर यशस्वी उपचार
आरोग्य

व्यसनाच्या गर्तेतून नवजीवनाकडे: डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणावर यशस्वी उपचार

May 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group