• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

कु. पुर्वा राजपूत शाळेतुन प्रथम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 17, 2022
in शैक्षणिक
0
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

जळगाव, दि.१७ – जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता १० वी चा सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनीनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. अनुभूती शाळेत यंदा १० वी साठी एकूण ५१ विद्यार्थी होते, त्यातील ५० विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह गुणवत्ता यादीत आले आहे तर एक विद्यार्थी प्रथम वर्गात ( फर्स्ट क्लास ) आला आहे.

या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिली असता ९०% च्यावर गुण मिळविणारे १५, ८१ ते ९० टक्के गुण मिळविणारे ३४, ७४ ते ८० टक्के गुण मिळविणारे २ विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. पुर्वा रविंद्रसिंग राजपूत -प्रथम (९५.६० %), वैष्णवी भास्कर पवार, निकिता गौतम सोनवणे – द्वितीय (९४.००%), दिव्या विलास बारी- तृतीय (९३.२० %), राज चंद्रकांत सोनवणे- चतुर्थ (९२.६०), प्रथमेश शाम वाघ, कु.तेजल दिपक चौधरी- पाचवे (९२.२०) ठरली.
गुणवत्ताधारक उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.

इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्र, गणित व सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९५ च्यावर गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात राज सोनवणे व पुर्वा राजपूत ९८ गुण, गणित विषयात वैष्णवी पवार ९५ गुण, मराठी विषयात दिशा सपकाळे ९४ गुण, हिंदीमध्ये पुर्वा ९३ गुण तर इंग्रजी विषयात कु. क्रिष्णा भानुदास चव्हाण ९३ गुण मिळविले आहेत.

कोविड नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष परिक्षा व घरची हलाखीची परिस्थिती अशा आव्हानात्मकस्थितीत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खूप दैदिप्यमान आहे, त्यांच्या या यशात अनुभूती स्कूलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाचा मोलाचा सहभाग आहेच, सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल हे त्याचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली.

शाळेत प्रथम आलेली पुर्वा राजपूत हिचे वडिल खासगी कंपनीत आहेत. दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वैष्णवीचे वडिल कारपेंटर तर निकिताचे वडिल पेंटर आणि आई धुणीभांडी काम करतात. तृतीय आलेल्या दिव्या बारीची आई साफसफाई करतात. चतुर्थ आलेल्या राज सोनवणेचे वडिल शेतकरी आहेत तर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रथमेशचे वडील लॉड्री तर आई धुणीभांडी करतात. त्याच्यासोबत उत्तीर्ण झालेली कु. तेजल चौधरीची आई खासगी शिकवणी घेतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मिळवलेल्या या यशामुळे सर्वांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.

समाजसेवा हा संस्कार आदरणीय भवरलालजी जैन यांच्या विचारांमधून घेतल्याचे सांगत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील दिशा निश्चित करताना डॉक्टर, आयपीएस, आयएएस, आयटी इंजिनीअर तर इंडियन नेव्हीमध्ये देश सेवा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

 


Next Post
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी नळ तोटी आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी नळ तोटी आंदोलन

ताज्या बातम्या

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा
जळगाव जिल्हा

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

June 17, 2025
एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
खान्देश

एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

June 17, 2025
शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना
कृषी

शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

June 17, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

June 16, 2025
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
जळगाव जिल्हा

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

June 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group