• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासकीय अनुदानासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 11, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
शासकीय अनुदानासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

गजानन पाटील | अमळनेर, दि. ११ – तालुक्यातील २०१९ मधील अतिवृष्टी बाधित ३८, गावातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने शुक्रवारी शिरपूर अमळनेर महामार्गावर एकलहरे येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते शिवाजीराव पाटील, आम आदमी पार्टीचे डॉ. रुपेश संचेती,आपचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील, दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारून शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. ३५ कोटी ४० लाख रुपये, शासकीय अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी आम आदमी पार्टीचा संघर्ष यापुढे ही जर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर असाच संघर्ष पुढे सुरू राहील.

शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आम आदमी पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते मंत्रालयावर धडक मोर्चा नेऊन आंदोलनाद्वारे जाब विचारण्यासाठी आम आदमी पार्टी च्या वतीने पुढील रणनीती लवकरात लवकर तयार करून. धोरणानुसार तसेच वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. असे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना व शेतकरी यांना आवाहन केले.

सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांच्यासमक्ष रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी परिसरातील दिलीप बाबुराव पाटील मारवड सतीश बडगुजर, राजेंद्र भाऊराव पाटील, मधुकर पाटील गोवर्धन, राजू महाराज, अशोक विनायक पाटील, भरवसचे सरपंच गुलाबराव सिसोदे, बाबा सुर्वे, झुंबर पाटील तसेच समस्त परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व कर्मचारी यांनी आंदोलनाठिकाणी बंदोबस्त ठेवला होता.

Next Post
मेहरूणच्या जामा मशिदीत ‘मस्जिद परिचय’ व ईद मिलन कार्यक्रम

मेहरूणच्या जामा मशिदीत 'मस्जिद परिचय' व ईद मिलन कार्यक्रम

ताज्या बातम्या

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
गुन्हे

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

March 20, 2026
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group