• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

फालीच्या माध्यमातून उद्योजक बनलेल्या ६ जणांचे अनुभव कथन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 30, 2022
in कृषी
0
जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

जळगाव, दि. ३० – शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योगाची चालना मिळावी या मुख्य उद्देशाने गत ७ वर्षांपासून जैन हिल्स येथे संम्मेलन भरविण्यात येत आहे. गुजरात व महाराष्ट्रातील राज्यातील १३५ शाळांतील ११ हजार विद्यार्थ्यांमधून ८०० विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या ८ व्या संम्मेलनाचे आयोजन १ ते ५ जून दरम्यान जैन हिल्स येथे करण्यात आलेले आहे. १ व २ तसेच ४ व ५ जून अशा दोन टप्प्यात हे संम्मेलन होईल.

शाळाशाळांमधून फालीच्या माध्यमातून सुमारे २५ हजार हून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेले आहे. नादीर गोदरेज (अध्यक्ष फाली व गोदरेज ग्रुप), रजनिकांत श्रॉफ अध्यक्ष यूपीएल, अनिल जैन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन, नॅन्सी बेरी – उपाध्यक्ष असोसिएशन फॉर फाली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या संम्मेलनाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक कृषी उद्योजक यशस्वी झालेले आहेत हे या संम्मेलनाचे फलीत म्हणता येईल. अशा ६ यशस्वींचे अनुभव कथन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी फालीमुळे शेतीकडे उत्तम करियर म्हणून तसेच ते उदरनिर्वाहाचे सुयोग्य साधन आहे अशी दृष्टी विद्यार्थी व पालकांमध्ये आलेली आहे. फालीत सहभागी विद्यार्थी आपल्या शेतकरी पालकाला त्याला मिळालेल्या शेतीविषयक ज्ञानाचा त्याच्या शेतीसाठी उपयोग करू लागला आहे.

विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीपद्धती त्यांच्या कौटुंबिक शेतीत वापरायला सुरवात केल्यामुळे उत्पादनात वाढ झाली व पर्यायाने कौटुंबीक आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. फालीमुळे कृषि व्यवसायाचा समृद्ध मार्ग गवसला आहे. फालीच्या आठव्या संम्मेलनास गोदरेज अॅग्रोव्हेट, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, युपीएल, स्टार अॅग्री आणि ओमनीव्होर या कृषी क्षेत्रातल्या अत्यंत नावाजलेल्या कंपन्यांचे सौजन्य लाभलेले आहे.

Next Post
शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add