• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 30, 2022
in जळगाव जिल्हा
0
शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

जळगाव, दि. ३० – रावेर तालुक्यातील मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन विषयी संबंधित विभाग मूल्यांकन अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे पुढील कार्यवाहिस विलंब होत आहे , तरी त्यांनी त्वरित अहवाल सादर करावा. पुनर्वसना करीता गट नंबर २२२ /१ हा समाविष्ट करण्यात आले असुन या गट नंबर वर संबंधित शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या प्लॉट पडलेले असल्याने त्या सर्व नोंदी रद्द करण्यात याव्या व शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी . या मागण्यांसाठी शिंगाडी गावातील ग्रामस्थांनी सोमवार पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सुरू केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील शिंगाडी गावाचे पुनर्वसनाला सन २००७ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली होती, त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यामध्ये पुनर्वसनासाठी ८ गट नंबर संपादित करण्यात आलेले आहे. त्यापैकी गट नंबर २२२/१ हे सुद्धा समाविष्ट आहे. सदर क्षेत्र सुस्थितीत असुन देखील ते क्षेत्र संबंधित शेतकऱ्यांनी कायदा धाब्यावर बसवत त्या क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर प्लॉट पाडून खरेदीखत केले आहे आणि बिनशेती नसलेली शेतीचे उतारे शिंगाडी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांनी नमुना नंबर ८ ला लावले, याची संपूर्ण चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी यासाठी आज जळगावात आंदोलन करण्यात आले.

कार्यकारी अभियंता सरदार सरोवर विभाग १ यांना फैजपूर प्रांत कार्यालयातुन ४ वेळा स्मरणपत्र देऊन देखील यांनी सदर जमिनीचे मूल्यांकन अहवाल सादर केलेला नाही. मूल्यांकन अहवालाअभावी निवाडा घोषित होऊ शकणार नाही. त्यासाठी अनेकदा गावकरी मंडळी व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेतली मात्र काही एक उत्तर त्यांनी दिले नाही. त्यामुळेच ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करीत आंदोलनाला सुरुवात केली. ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊन त्यांना न्याय न मिळाल्यास, समस्त गावकरी तापी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतील असा ईशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.

दरम्यान आंदोलनात अनिल बगाडे, अमृत पाटिल, उमेश गाढे, संदीप कोजगे, फुलसिंग कोजगे, आनंदा कोजगे, विजय बगाडे, रमेश पाटिल, विश्वनाथ पाटिल, साहेबराव पाटिल, यादव पाटिल, संतोष बगाडे, प्रभाकर बगाडे, भागवत बगाडे, हिरामण कोजगे, सुमनबाई बगाडे, पुताबाई कोजगे, लिलाबाई कोजगे, गोविंदा कोजगे, प्रविण कोजगे, आशाबाई कोजगे आदि ग्रामस्थ सहभागी झाले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाचे (आठवले गट) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, भुसावळ नगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलिप सपकाळे यांनी भेट देऊन शिंगाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

 


Next Post
जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर

जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर

ताज्या बातम्या

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी
जळगाव जिल्हा

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी

June 13, 2025
तलवारीने दहशत माजवणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

तलवारीने दहशत माजवणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 13, 2025
वादळी पाऊस: चाळीसगावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान, आ. मंगेश चव्हाण यांची पाहणी
कृषी

वादळी पाऊस: चाळीसगावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान, आ. मंगेश चव्हाण यांची पाहणी

June 13, 2025
धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या
जळगाव जिल्हा

धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या

June 12, 2025
कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा
जळगाव जिल्हा

कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा

June 12, 2025
शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती
जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती

June 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group