• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘ग.स.सोसायटी’च्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन यांची निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 30, 2022
in राजकीय
0
‘ग.स.सोसायटी’च्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन यांची निवड

जळगाव, दि. ३० – आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ‘ग. स. सोसायटी’ च्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सोसायटीच्या स्वीकृत संचालकांची अधिकृत निवड जाहिर करण्यात आली.

‘ग.स.सोसायटी’च्या नवनिर्वाचित संचालकांची ही बैठक म्हणजेच सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची पहिलीच सभा होय. सोसायटीच्या अधिनियमानुसार सभेमध्ये दोन स्वीकृत संचालक स्वीकारण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने या सभेत सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत ‘ग.स.सोसायटी’चे ‘स्वीकृत संचालक’ म्हणून शिक्षिका तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.

दरम्यान, मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते राम पवार यांची निवड आधीच जाहीर झाली होती. त्याअनुषंगाने आजच्या या सभेत महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्यासमवेत दोन्ही स्वीकृत संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील, महेश पाटील, भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश इंगळे, अजय देशमुख, विश्वास पाटील, मंगेश भोईटे, रागिणी चव्हाण, वाल्मिक पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन उपस्थित होते.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘ग.स. सोसायटी’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संपूर्ण संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याला कायम ठेवीत विश्वासास तडा जाणार नाही, तो नेहमी जपला जाईल, असा विश्वास देत, मुळात मी स्वत: शिक्षक असून या सोसायटीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही शिक्षकांचीच असल्यामुळे या सर्व सभासदांना न्याय देण्यासाठी नवनिर्वाचित सर्व संचालकांच्या निर्णया सोबत सदैव राहीन, अशी ग्वाही देत महापौर जयश्री महाजन यांनी यावेळी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.

Next Post
परिवर्तन पुस्तक भिशी वाचक घडवणारा उपक्रम – श्रीपाद जोशी

परिवर्तन पुस्तक भिशी वाचक घडवणारा उपक्रम - श्रीपाद जोशी

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी
गुन्हे

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी

May 9, 2026
कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित
गुन्हे

कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

May 9, 2026
नशिराबाद महामार्गावर महावितरणचा अडथळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे सत्र, प्रशासनाचे दुर्लक्ष
जळगाव जिल्हा

नशिराबाद महामार्गावर महावितरणचा अडथळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे सत्र, प्रशासनाचे दुर्लक्ष

May 9, 2026
जळगाव जिल्ह्यात पोलिसांची ‘विशेष नाकाबंदी’! ५ तासात ३१९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
गुन्हे

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची ‘विशेष नाकाबंदी’! ५ तासात ३१९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

May 9, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
जळगाव जिल्हा

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

May 9, 2026
व्यसनाच्या गर्तेतून नवजीवनाकडे: डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणावर यशस्वी उपचार
आरोग्य

व्यसनाच्या गर्तेतून नवजीवनाकडे: डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणावर यशस्वी उपचार

May 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group