• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डेक्सट्रोकार्डिया रुग्णाची दुर्मिळ अशी हृदय शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी

मागील ८ वर्षात १५०० पेक्षा जास्त रुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 26, 2022
in आरोग्य
0
डेक्सट्रोकार्डिया रुग्णाची दुर्मिळ अशी हृदय शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी

जळगाव, दि.२५ – ऑर्किड मल्टी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल येथे ५३ वर्ष वयाच्या रुग्णांवर मार्च महिन्यात दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली. मुंबई येथील डॉ. राहुल कैचे व त्यांच्या सर्जिकल टीमने हि शस्त्रक्रिया जळगावात पूर्ण केली. आजपर्यंत जगामध्ये फक्त ३२ रुग्णांवर म्हणजेच उजव्या बाजूला हृदय असलेल्या (डेक्सट्रोकार्डिया) अशी शस्त्रक्रिया झालेली आहे.

महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया जळगावच्या शेख गुलाम रसुल शेख या रूग्णावर झाली असल्याचे हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल कैचे यांनी बुधवारी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी डॉ. परेश दोषी, प्रिती दोशी, डाॅ. उदयसिंग पाटील, डॉ. प्रशांत बोरले आदी उपस्थित होते.

सर्वसाधारणपणे आपले हृदय छातीच्या पिंजऱ्यात डाव्या बाजूला असते, परंतु सदर रुग्णाचे हृदय हे छातीच्या उजव्या बाजूला (डेक्सट्रोकार्डिया) होते. जगात सर्वसाधारणपणे १२००० नवजात अर्भकांमधून एक अर्भक असे प्रमाण आहे. डेक्सट्रोकार्डिया मुळे ही एक अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया असते. तसेच सदर रुग्ण शेख गुलाम यांची हृदय कार्यक्षमता ( LVEF ) ३० % च होती. त्यामुळे ही एक अत्यंत उच्च जोखमीची हृदय – शस्त्रक्रिया हृदयाचे कार्य सुरु ठेऊन ( बिटिंग हार्ट ) पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

शेख यांच्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ.राहुल कैचे व सर्जिकल टीम, डॉ. परेश दोषी, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. प्रशांत बोरले, डॉ. प्रफुल्ल काबरा, आय.सी.यू. टीम डॉ. समीर लोहार (भुलतज्ञ) तसेच ऑर्किड हॉस्पिटल मधील कुशल नर्सिंग टीमचे विशेष योगदान लाभले. जळगावातील ऑर्किड मल्टी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल मध्ये मागील ८ वर्षात १५०० पेक्षा जास्त रुग्णांवर डॉ. राहुल कैचे आणि डॉ. योगेश बेलापूरकर व सर्जिकल टीमने हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी यंत्र शाखेच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

गोदावरी अभियांत्रिकी यंत्र शाखेच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सामाजिक कार्यकर्त्या रुमा देवी यांचा प्रेरणादायी संवाद
जळगाव जिल्हा

सामाजिक कार्यकर्त्या रुमा देवी यांचा प्रेरणादायी संवाद

July 2, 2022
गोर सेना संघटनेतर्फे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

गोर सेना संघटनेतर्फे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

July 1, 2022
अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाज्याचा बुरूज पुन्हा कोसळला
जळगाव जिल्हा

अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाज्याचा बुरूज पुन्हा कोसळला

June 30, 2022
महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी संभाजीनगरला जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना
क्रिडा

महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी संभाजीनगरला जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना

June 30, 2022
जळगांव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण
जळगाव जिल्हा

जळगांव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण

June 30, 2022
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा घेण्याकरीता सहकार्य
जळगाव जिल्हा

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा घेण्याकरीता सहकार्य

June 29, 2022
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.