जळगांव, दि. ०७ – जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशन व के.सी.ई. सोसायटी, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी के.सी.ई. सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या एकूण ६५ खेळाडूंची निवड झाली आहे.
सदर स्पर्धा महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने ०८ मे ते ११ मे २०२२ दरम्यान एकलव्य क्रीडा संकुलातील नव्याने तयार करण्यात आलेल्या ०५ स्क्वॅश कोर्टस येथे घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीचा संघ सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर या गटात सहभागी होणार आहे.
या संघामध्ये खालील खेळाडूंची निवड झालेली आहे.
११ वर्षाआतील वयोगट मुले
वेद दिलीप पाटील, चारुदत्त राहुल राणे, कवन परेश सोनी
११ वर्षाआतील वयोगट मुली
श्रद्धा योगेश सुवर्णकर
१३ वर्षाआतील वयोगट मुले
अंकित हरिचंद्र कोळी, परीक्षित संदीप महाजन, दक्षित सुरेश महाजन
१३ वर्षाआतील वयोगट मुली
कार्तिकी प्रशांत जयकर, सानिका गौरव भन्साली, अनुष्का समीर वाणी
१५ वर्षाआतील वयोगट मुले
आदित्य संजय शिवदे, स्मित विद्याधर भालेराव, विवेक प्रविण कोल्हे, पियुष मनोहर पाटील, हर्षद भूषण जाधव, कार्तिक सुनील सैंदाणे
१५ वर्षाआतील वयोगट मुली
ऋतुजा संजय शिवदे, गौरी पद्माकर खाचणे, गौरी राजेश पिंगळे, गार्गी विजय पाटील, याद्निका धनंजय पाटील, हर्षित रणजित पाटील
१७ वर्षाआतील वयोगट मुले
खुशाल सुभाष राठोड, देवेंद्र हरिचंद्र कोळी, प्रणव समाधान पाटील, रोहित नरेंद्र पाटील, करण अतुल इंगळे, गणेश सुभाष तळेले, वरद विलास देशमुख
१७ वर्षाआतील वयोगट मुली
सिद्धी संदीप पाटील, सुप्रिया प्रशांत श्रावगी, ट्युलिप अजितकुमार पाटील, ललिता उदय वाणी
१९ वर्षाआतील वयोगट मुले
वेद मिलिंद चौधरी, आदित्य मिलिंद भालेराव, सुजल दिलीप पाटील, कीर्तन राजीव मेहता, खुशल राजेंद्र भास्कर, जयेश विजय राठोड, अनीकेत अविनाश देओळे, तनिष्क लक्ष्मिकांत नेवे
सिनिअर गट पुरुष
किशोर शांतीलाल भोई, सन्दीप अनिल चौधरी, गौरव भानुदास शिरसाळे, प्रविण रमेश राव, जितेंद्र उदयसिंग राठोड, ईश्वर रमेश जोशी, राहुल अनंत आंबीकर, खुशवंत किरण पाठक, पुनित राजेश लालवाणी, शुभम दीपक मंडोरे, प्रविण दामोदर कोल्हे, शुभम सुधाकर धंगेकर, राहुल हरिष पाटील, यश संदीप पाटील, सागर कैलास सोनवणे, सुनील सुमंत आडवाणी, विनय कैलास काबरा, आकाश अशोक धनगर
सिनिअर गट महिला
राजश्री संदीप चौधरी, प्रणिता प्रशांत श्रावगी, कोमल रवींद्र गायकवाड, रीना हिम्मत पाटील, कोमल हिम्मत पाटील, उत्कर्षा मनीष अत्तरदे
निवड झालेल्या खेळाडूंना प्रा. प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभत असून या यशाबद्दल डी.टी.पाटील, शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. एस.एन. भारंबे, जळगांव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष हर्षल चौधरी, क्रीडा संचालक व सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सहसचिव डॉ. रणजीत पाटील, उपाध्यक्ष सचिन महाजन, खजिनदार दीपक वाडे व सदस्य डॉ. नवनीत आसी, डॉ. आनंद उपाध्याय, संदीप महाजन, संजय महिरे, वैशाली बाविस्कर यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.