अमळनेर, दि. ०९ – तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी असलेल्या ४३ वर्षिय तरूणचा सूरत येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
तरूणाचे नाव हिरामण साहेबराव महाजन असून तो कामा निमित्त सुरत येथे राहत होता. हिरामण याची घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने तो बारा ते पंधरा वर्षेपासून कामानिमित्त सुरत येथेच राहत होता.
अचानक तब्बेत बिघडल्याने त्यास सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान त्याचा मृत्यू उष्माघात ने झाला असल्याचा अंदाज तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी आप्तेष्टांना दिला आहे.